व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

0

नवीन नाशिक : सिडको मधील उत्तमनगर भागात  खासगी व्यायामशाळेत व्यायाम सुरू करण्यापूर्वीच चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अजिंक्य पांडुरंग लोळगे (१९, रा. शिवपुरी चौक, उत्तमनगर) या तरुणाने तीन दिवसांपूर्वीच माणिकनगर येथील बॉडी झोन जीममध्ये प्रवेश घेतला होता.
शुक्रवार दि. १६ रोजी तो जीममध्ये गेला असता अवघ्या पाच मिनिटातच चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले.
आई वडिलांचा एकुलता एक असलेला अजिंक्य हा गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी असून इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षासाठी त्याने प्रवेश घेतला होता.
त्याच्या पश्‍चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार असून त्याच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*