नाशिककर ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ ‘बारावी पास’

0
नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ चांगल्या गुणांनी ‘बारावी पास’ झाला आहे.

रोईंगपटू असणाऱ्या दत्तु बबन भोकनळ यास बिजींग येथील 16 व्या एशियन चॅम्पीयनशिप 2015 चे रौप्यपदक प्राप्त केले होते. त्याचा केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे गौरव करण्यात आला होता.

रोईंग म्हणजेच नौकानयन क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या दत्तू भोकनळने यंदा बारावीची परीक्षा दिली होती.

नाशिकच्या तळगाव-रोही मध्ये राहणाऱ्या दत्तूला लासलगावच्या दत्ताजी पाटील हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्रात त्याने  परीक्षा दिली. सहा वर्षांपूर्वी दहावीनंतर दत्तू लष्करात दाखल झाला आणि त्याने रोईंग खेळात प्राविण्य मिळवले.

रोईंगमध्ये कारकीर्द सुरु केल्यानंतर  झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षण घेने शक्य झाले नाही. त्यामुळे सहा वर्षांच्या विलंबानंतर  अखेर दत्तूने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. दत्तू आता बारावी चांगल्या गुणांनी पास झाला आहे.

LEAVE A REPLY

*