अभिनेत्री झायरा वसिमची कार दाल लेकमध्ये कोसळली

0

दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री झायरा वसिम एका दुर्घटनेतून बचावल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.

मुळची श्रीनगरची असलेली झायरा प्रवास करत असताना तिची कार दाल लेकमध्ये पडली.

गुरुवारी ही घटना घडल्याचे समजते.

झायरा गुरुवारी कारने प्रवास करत होती. त्यावेळी कार बोलवर्ड रोडला येताच कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दाल लेकमध्ये जाऊन पडली. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, झायरा प्रवास करत असलेली कार तेथील स्थानिक नेत्याची होती. यावेळी झायरासोबत तिचा मित्र अरिफ अहमददेखील होता, असे ‘ग्रेटर कश्मीर’ने म्हटले आहे. झायराच्या कारचा अपघात होताच तेथील स्थानिक रहिवाशांनी या दोघांना दाल लेकमधून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. या अपघातात झायराला कोणतीही इजा झाली नसून तिचा मित्र काही प्रमाणात जखमी झाल्याचे स्थानिकांनी ‘आएएनएस’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

LEAVE A REPLY

*