#CT2017: सराव सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

0
ओव्हल येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडला ४५ धावांनी पराभूत केले.
भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडचा अवघ्या ३८.४ षटकांत १८९ धावांत खुर्दा उडाला. यानंतर भारताने २६ षटकांत ३ बाद १२९ धावा काढल्या होत्या.
यानंतर मैदानावर पावसाने हजेरी लावली.
पावसाचा जोर वाढत गेला आणि नंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेर पंचांनी सामना डकवर्थ लुईस नियमाची मदत घेऊन संपवला.
सामना थांबला तोपर्यंत भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार ८४ धावा काढणे गरजेचे होते. भारताच्या १२६ धावा झाल्या होत्या.
यामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले. धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक ठोकले. कोहलीने ५५ चेंडूंत ६ चौकारांच्या साह्याने नाबाद ५२ धावा काढल्या होत्या.
खेळ थांबला त्यावेळी कोहलीसोबत माजी कर्णधार धोनी १७ धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, न्यूझीलंडने भारतापुढे गुडघे टेकले. किवींकडून रोंचीने (६६)एकट्याने झुंज दिली. मो. शमी, भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

LEAVE A REPLY

*