#CT2017: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड सोमवारी

0

बीसीसीआयच्या विशेष सभेच्या एक दिवस आधीच बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना यांनी टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ सोमवारी म्हणजे आठ मे रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे.

यासाठी बहुतांश देशांची संघ निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मात्र टीम इंडियाची अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*