#CT17 : INDvsSA : आफ्रिकेला 6वा धक्का; 167/6

0
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 11व्या सामन्यात भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 37 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 167 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटाच्या सामन्यात रविवारी भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे.
या सामन्यातील विजेत्याला सेमीत खेळण्याची संधी मिळेल. ब गटातून भारत आणि द. आफ्रिका हे दोन्ही संघ सेमीफायनलचे दावेदार मानले जात होते. मात्र, आता यातील एकच संघ सेमीत खेळेल. जगातील नंबर वन टीम द. आफ्रिकेला आठव्या क्रमांकाचा संघ पाकिस्तानने हरवले होते. याच्या पुढच्या दिवशी सातव्या क्रमांकाची टीम श्रीलंकेने नंबर दोनची टीम भारताला मात दिली होती.
भारत आणि द. आफ्रिकेच्या पराभवामुळे ब गटातील समीकरण रोमांचक झाले आहेत. आता चारही संघांचे प्रत्येकी दोन गुण अाहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत- द. आफ्रिका आणि श्रीलंका-पाकिस्तान सामन्यावरून निर्णय होईल. या दोन्ही लढती निर्णायक होतील.

LEAVE A REPLY

*