#CT17 #INDvsPAK : बीजिंग ऑलिम्पिकहून अधिक प्रेक्षक

0
 थेट प्रक्षेपण : दुपारी ३ वाजेपासून स्टार स्पोर्ट्सवर
क्रिकेटसंबंधी संस्थांनुसार, भारत-पाकिस्तान ही रविवारी होत असलेली चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम लढत जगातील १२.५% लोकसंख्या म्हणजे सुमारे १०० कोटी लोक पाहतील. हे खरे ठरलेच तर सर्वाधिक लोकांनी पाहिलेला हा पहिला सामना ठरेल. बीजिंग ऑलिम्पिक उद्घाटन साेहळाही इतक्या लोकांनी पाहिला नव्हता.
– २०११ वर्ल्डकपमध्ये भारत-पाक उपांत्य लढत ९८ काेटी लोकांनी पाहिली. आजवरचा तसा सर्वाधिक लोकांनी पाहिलेला सामना होता.
– या स्पर्धेत ४ जून रोजीचा भारत-पाक सामना ३२.४० कोटी लोकांनी पाहिला.
– आयपीएलच्या ६० सामन्यांचे एकूण ४१ कोटी प्रेक्षक असतात. क्रिकेट वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्याला १५ कोटी प्रेक्षक मिळतात.
महसूल : जाहिरात दर १० पट वाढला, ३० सेकंदांचे १ कोटी
– स्पर्धेमध्ये आतापर्यंत ३० सेकंदांचा अॅड स्लॉट १० लाख रु.चा होता. मात्र, भारत-पाक सामन्यासाठी ३० सेकंदांचा स्लॉट १ कोटी रुपयांचा झाला आहे.
– लंडनचे ९० % पेक्षा जास्त टीव्ही स्पॉट बुक झाले आहेत. ते निस्सान मोटर, इंटेल कॉर्प, एमिराइट्स, ओप्पो आणि एमआरएफने बुक केले आहेत. उर्वरित १० % स्लॉटमधून २० कोटींची कमाई होईल.

LEAVE A REPLY

*