#CT17: IND- PAK यांच्यात आज हायवोल्टेज ड्रामा, सामन्यावर पावसाचे सावट

0
भारत अाणि पाकिस्तान टीम तब्बल २८ महिन्यांनंतर एक दिवसीय सामन्यामध्ये भिडणार अाहेत.
या दाेन्ही संघांतील शेवटचा वनडे सामना २०१५ मध्ये वर्ल्डकपदरम्यान झाला हाेता.
यामध्ये भारताने ७६ धावांनी विजय संपादन केला हाेता. त्यानंतर अाता हे दाेन्ही कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये समाेरासमाेर असतील.
अातापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये एकूण १० सामने झाले. यातील सहा सामन्यांत भारताने विजयी पताका फडकवली. चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकचे पारडे जड अाहे.
अातापर्यंत चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये तीन सामन्यांत पाक अाणि भारत संघ झुंजले. यामध्ये पाकची या स्पर्धेत भारताविरुद्ध २-१ ने अाघाडी अाहे. भारताला एकमेव विजय संपादन करता अाला.
याच मैदानावर २०१३ नंतर पुन्हा दाेन्ही संघ समाेरासमाेर : भारत अाणि पाकिस्तान संघ पुन्हा
एकदा याच मैदानावर झुंजणार अाहेत.
गत २०१३ मध्ये या दाेन्ही संघांमध्ये बर्मिंगहॅमच्या मैदानावर सामना झाला हाेता. यात भारताने पाकला धूळ चारली हाेती.
सचिन करणार काॅमेंट्री
सामन्यावर पावसाचे सावट
बर्मिंगहॅममध्ये १२ टक्के पाकिस्तानी व ६ टक्के मूळ भारतीय राहतात. २००४ अाणि २०१३ मध्ये झालेल्या भारत-पाक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जवळपास ७० टक्के समर्थक हे टीम इंडियाचे अाणि ३० टक्के पाकिस्तानचे हाेते.

LEAVE A REPLY

*