#CT17: श्रीलंकेची टीम इंडियावर 7 विकेटने मात

0
चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेने टीम इंडियाला ७ विकेटने नमवले.
गुणथिलका (७६), कुशल मेंडीस (८९), कुशल परेरा (४७), मॅथ्यूज (नाबाद ५२), गुणरत्ने (नाबाद ३४) या फलंदाजांनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेने विदेशात ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वीपणे नवव्यांदा पाठलाग करताना भारताचा (८) विक्रम मोडला. श्रीलंकेने ३२२ धावा हा श्रीलंकेचा धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे.
तत्पूर्वी, भारताकडून रोहित-धवनने २४.५ षटकांत १३८ धावांची शतकी सलामी दिली. डावखुरा फलंदाज शिखर धवनने १२८ चेंडूंत १५ चौकार, १ षटकारासह १२५ धावा कुटल्या. रोहितने ७९ चेंडूंत ३ षटकार, ६ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली. पुन्हा एकदा रोहितचे शतक हुकले. त्याने मागच्या सामन्यात ९१ धावा काढल्या होत्या. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ५२ चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांच्या साह्याने ६३ धावांची खेळी केली. केदार जाधवने १३ चेेंडूंत नाबाद २५ धावांत ३ चौकार आणि १ षटकार मारला.

LEAVE A REPLY

*