#CT17: भारताची आज श्रीलंकेविरुद्ध लढत

0

चॅम्पियन्स ट्रॉफीत 8 जून रोजी भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत रंगणार आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी मागील सामन्यात शानदार परफॉर्मन्स दिला होता. श्रीलंकेसमोर सगळ्यात मोठी समस्या ही उपकप्तान उपुल थरंगा संघाबाहेर असणे ही आहे.

उपुल थरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात कप्तानी केली होती.

त्यावेळी एंजिलो मैथ्यूज हे फीट नव्हते. स्लोओवर रेट या कारणास्तव आईसीसीने त्यांच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घातलेली आहे.

यामुळे उपुल थरंगा चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन सामने खेळू शकणार नाहीत. श्रीलंकेची टीम सेमीफाइनलमध्ये पोहचल्यास त्यांना खेळण्याची संधी मिळू शकते.

LEAVE A REPLY

*