#CT 2017: दुखापतीमुळे मनीष पांडेची माघार, `दिनेश कार्तिकला संधी

0

मनिष पांडेला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून, त्याच्याऐवजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनं भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.

राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्येही सातत्याने केलेल्या धावांचं कार्तिकला भारतीय संघाच्या निवडीच्या रुपानं बक्षीस मिळालं आहे.

कार्तिकनं यंदाच्या मोसमात वन डे सामन्यांच्या विजय हजारे करंडकात 604 धावा फटकावल्या होत्या.

यंदा रणजी करंडकात त्याच्या नावावर 704 धावा आहेत, तर आयपीएलमध्ये त्यानं 361 धावा केल्या आहेत. दरम्यान, 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातही दिनेश कार्तिकचा समावेश होता.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा संघ: विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्ये रहाणे, एमएस धोनी, युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रविन्द्र ज़डेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह और दिनेश कार्तिक.

LEAVE A REPLY

*