मुलीवर अत्याचार करणार्‍या कैद्यावर अत्याचार

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तेवीस वर्षीय मतीमंद मुलीवर दोन आरोपींनी तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अत्याचार केला. या आरोपींना ग्रामिण पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी एका आरोपीला सबजेलमधील अन्य आरोपींनी तू काय गुन्हा केला असे म्हणून त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दि. 20 जून 2017 पूर्वी 7 ते 8 महिन्यापासून पिन्या उर्फ रमेश म्हसू जाधव रा. माहेगाव देशमुख व गोट्या उर्फ किरण भागवत कदम रा. कुंभारी या आरोपींनी माहेगाव देशमुख येथीलच एका 23 वर्षीय मतीमंद मुलीवर तिच्या मतीमंदपणाचा फायदा घेऊन शेतात व महादेव मंदिराच्या मागे अत्याचार केला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 67/2017 भादंवि कलम 376(3) (एल) (एन) 376(ड) 506, 34 अन्वये वरील आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
वरील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना तुरुंगात रवाना केले. वरील आरोपींपैकी पिंट्या उर्फ गोरख भागवत कदम (वय 30) यांस बरॅक नंबर 5 मध्ये ठेवले. या सबजेलमधील आरोपींनी पिंट्याला तू काय गुन्हा केला असे खोदून खोदून विचारले. त्याने मी एका मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली. या सबजेलमधील आरोपींनी आरोपी पिंट्या यास अंगावरील कपडे काढण्यास सांगितले, त्याच्याकडून अश्‍लील कृत्य करवून त्याच्यावर अत्याचार केला.
याबाबत पिंट्या उर्फ गोरख भागवत कदम याने जेलमधील 10 आरोपींविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. 74/2017 भादंवि कलम 377 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार/अत्याचार काय असतो याचा प्रत्यय जेलमधल्या आरोपींनी या आरोपीस करून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे तपास करीत आहेत.

दुय्यम कारगृहात जीपीआरएस यंत्रणा बसवलेल्या आहेत. कारागृहातील प्रत्येक हालचाली सिसिटीव्ही कॅमेर्‍यात टिपल्या जातात. एवढी मोठी घटना घडत असताना व आरोपी किंचाळत असताना कोणाच्या लक्षात आले नाही हे विशेष. पोलीस निरीक्षकच काय वरिष्ठांनाही याचा आँखो देखा हाल गेलेला आहे. तरीही या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली नाही. याबाबत आता वरिष्ठ काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*