शेवगावच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडताना पोलिसांवर हल्ला : नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा शिवारातून चौघांना अटक

0

पोलिसांवर गोळी झाडली; गलोरीतून दगड व हत्यार फेकून मारण्याचा प्रयत्न; दोघे आरोपी दिघीचे तर दोघे मुकिंदपूरचे

नेवासा (का. प्रतिनिधी)- शेवगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा तपास लावण्यासाठी आलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गोळीबार करुन गलोलीने दगडांचा वर्षावर करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रविवारी सकाळी तालुक्यातील बाभुळखेडा शिवारात घडली असून यावेळी पथकाने चौघा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दत्तात्रय आडवल यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर फर्स्ट 247/2017 भारतीय दंड विधान कलम 302 मधील आरोपींचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील फरार आरोपी नेवासा तालुक्यातील पिचडगाव, बाभुळखेडा शिवारात लपून बसले आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिंळाल्याने पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, सहायय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक हिंगोले, उपनिरीक्षक गुट्टे असे सहा अधिकार्‍यांबरोबर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व नेवसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांची सहा वेगवेगळी पथके बनवून नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील बाभुळखेडा शिवारात आरोपी दडून बसलेल्या ठिकाणाजवळ जाण्यासाठी तसेच आरोपी सदर ठिकाणाहून पळून जावू नये म्हणून चोहोबाजूंनी पथके नेमलेली होती.
रविवारी सकायी साडेसात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीन सरिीक्षक संदीप पाटील यांचे पथकासमोवत पोलीसन नाईक संदीप पवार, पोलीस नाईक संदीप घोडके, पोीस नाकि मनोज गोसावी, पोलीस नाकि राहुल हुसळे, पोलीस नाईक विजय ठोंबरे असे बाभुळखेडा शिवारातील सुरेश रामनाथ विधाटे यांचे शेताजवळ दबा धरुन बसलो असता आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी त्यांना पोलिसांची चाहुल लागल्यामुळे ते तेथून मोटारसायकलवरुन पळून जात असताना आमच्या दिशेने एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरुन वेगात येताना दिसले.
त्यावेळी मी व माझ्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता सदर मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या आरोपीने त्याच्या हातातील अग्नीशस्त्र आमच्या दिशेने रोखले असता आम्ही सर्व बचावासाठी जमिनीवर झोपलो. त्यावेळी सदर आरोपीने आमच्या दिशेने गोळी झाडली परंतु आम्ही सावध पवित्रा घेवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका आरोपीने आमच्या दिशेने त्याच्या हातातील गलोरीने दगड मारले. गलोर मारणार्‍या आरोपीला झडप घालून जागीच पकडले.
मात्र पोलीस नाईक मनोज गोसावी यांच्यावर धारदार शस्त्र फेकून मारणारा आरोपी बाजूच्या उसाच्या शेतात पळून गेला. त्यावेळी अतिरिक्त पोलीस बळ बोलावून घेतले. थोड्याच वेळात नेवाशाचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व अतिरिक्त पोलीस बळ आल्याने सर्वांनी सदर उसाचे विपक असलेल्या क्षेत्राचा बारकाईने शोध सुरु केला. सदर आरोपी उसाचे पाचरट अंगावर घेवून सरीत लपून बसलेला दिसला. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता अल्ताफ छगन भोसले रा. मुकिंदपूर ता. नेवासा असे सांगितले.
या घटनेबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बाभुळखेडा शिवारात सुरेश रामनाथ विधाटे यांचे शेताजवळ शासकीय कामकाज करत असताना आरोपी परसिंग हरसिंग भोसले, (रा. दिघी ता. नेवासा), रमेश छगन भोसले (मुकिंदपूर ता. नेवासा), उमेश हरसिंग भोसले (दिघी ता. नेवासा) व अल्ताफ छगन भोसले (रा. मुकिंदपूर ता. नेवासा) यांनी आमचे पथकातील अधिकारी व कर्मचारी हे शासकीय कामकाज करत असताना आम्हास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्नीशस्त्रातून गोळी झाडून तसेच त्यांच्याकडील गलोरीतून दगडले मारुन त्यांचे हातातील धारदार शस्त्रे आमच्या दिशेने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फेकून आमच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून माझी त्यांचेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 353, 34, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
सदर गुन्हा करतेवेळी आरोपी नामे उमेश हरसिंग भोसले याचे ताब्यातील गलोर व अरोपी अल्ताप छगन भोसले याने पोलिसांवर फेकून मारलेले धारदार लोखंडे शस्त्र तसेच आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल (एमएच 20 आरडी 1293) समक्ष हजर केली आहे.

LEAVE A REPLY

*