Friday, April 26, 2024
Homeनगरकोर्टाचा स्थगिती आदेश असताना नेवासा दूध संघाचे वीज कनेक्शन तोडले

कोर्टाचा स्थगिती आदेश असताना नेवासा दूध संघाचे वीज कनेक्शन तोडले

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुका दूध संघावर 10 ते 12 वर्षांपूर्वीची चौकशी करून महावितरणने 1 कोटी 24 लक्ष रुपयांचा दंड ठोठावला असून यामुळे दूध संघ पुरता अडचणीत सापडला असून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे दूध संघाचे संचालक असलेले व 2 वर्षापासून आजारी असलेले प्रशांत गडाख यांचेसह संचालक मंडळांवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

संघाचे वीज कनेक्शन कट करू नये यासाठी दूध संघांच्या वतीने नेवासा कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता. त्यास नेवासा कोर्टाने संघाचे म्हणणे ऐकून वीज कनेक्शन कट करण्यास स्थगीती दिली होती. तशी माहिती संघांच्या व्यवस्थापनाने महावितरणला कळवली होती तरीही मोठ्या राजकीय दबावामुळे नेवासा तालुका दूध संघाचे वीज कनेक्शन 22 फेब्रुवारी 2023 रोजी स्थगीती मिळवूनही त्याच दिवशी रात्री महावितरणच्या अधिकार्‍यांनी तोडले व कोर्ट आदेशाचा अवमान केला.राजकीय सूडभावनेतून केलेल्या या कारवाईमुळे दूध संघाचे संकलित झालेल्या दुधाचेही मोठे नुकसान झाले आहे.

फक्त राजकीय भावना ठेवून महावितरणने केलेल्या वीज तोडणीमुळे नेवासा संघाचे व संकलित झालेल्या दुधाचे वीज पुरवठ्याअभावी मोठे नुकसान झाले आहे. कोर्टात महावितरण विरोधात संघाच्यावतीने अवमान अर्ज दाखल झाल्याचे समजताच रात्री गुपचूपपणे महावितरणने 28 फेब्रुवारी रोजी विजपुरवठा सुरळीत करून दिला व सोम दि 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास दुधसंघापासून 2 किलोमीटर अंतरावर घोडेगाव जवळील पिंम्पर्‍याच्या पुलाजवळील मुख्य विद्युत पोलवरुन वीज कनेक्शन आज पुन्हा कट करण्यात आले असून महावितरण अधिकारी यांना संघ व्यवस्थापनाने स्थगिती आदेश दाखवूनही महावितरणने एककल्लीपणाने नेवासा तालुका दूध संघाचे वीज कनेक्शन वरिष्ठांचा आदेश आहे असे सांगून बंद केले आहे. महावितरणने राजकीय दबावातून नेवासा तालुका दूध संघावर कारवाई केली या विरोधात नेवासा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

अनेक खासगी कंपन्यांमध्ये वीज चोरी पकडण्यात येऊनही सदर कंपन्यांमधील वीज तोडणी वर्षानुवर्षे तोडण्यात न आल्याची अनेक उदाहरणे आहेत व सहकारी दूध संघाचे वीज कनेक्शन तोडू नये यासाठी कोर्ट आदेश असतानाही महावितरणने केवळ माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या संस्थेवर फक्त राजकीय भावनेतून कारवाई करण्यात आली आहे याचा नेवासा तालुक्यातून सर्वत्र निषेध होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या