लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठ्यास सक्तमजुरी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतातील बोअरची नोंद सातबारा उतार्‍यावर लावण्यासाठी 1000 रूपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील कामगार तलाठी अरूण नरहरी गायकवाड याला नगरच्या विशेष न्यायालयाचे न्या. आर. एम. पांडे यांनी 1 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 3 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
टाकळीमिया येथील बाबासाहेब अंजाबापू करपे यांनी शेतात बोअर घेतली होती. त्याची नोंद सातबारा उतार्‍यावर लावावी यासाठी करपे यांनी तलाठी अरूण गायकवाड याला विनंती केली. पण त्याने या कामासाठी त्यांच्याकडे 1 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी करपे यांनी लाचलुचपत विरोधी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला.  तलाठी गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले.व गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पो. नि. जे. डी. कळसकर व त्यांच्या सहकार्‍यांनी करून नगरच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याची सुनावणी झाली. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 चे कलम 7 प्रमाणे 1 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 3000 रूपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली. याकामी सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

*