बिहार : नगरसेवक केदार राय यांची गोळ्या झाडून हत्या

0

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमूख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय केदार राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

केदार राय बिहारमधील दानापूरचे नगरसेवक होते.

दुचाकीवर आलेल्या गुंडांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या केदार राय यांच्यावर जवळून गोळीबार केला.

त्यांनी त्वरीत एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

केदार राय यांच्या हत्येमुळे दानापूर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*