मीटर हेराफेरीचे कनेक्शन युपी ते नाशिक; जिल्हयात सहा पेट्रोल पंपाची कसून तपासणी

0
नाशिक । उत्तरप्रदेशमध्ये उघडकिस आलेल्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरीचे धागेदोर संबधं महाराष्ट्राशी असल्याचे ठाणे क्राईम ब्रँचच्या तपासातून उघडकिस आले आहे. विशेष म्हणजे युपीचे हे कनेक्शन नाशिकपर्यंत येउन पोहचल्याचे दोन दिवसातील तपासावरून दिसून आले.

ठाणे क्राईम ब्रँचने दोन दिवसात सहा पेट्रोल पंपाची तपासणी केली आहे. या कारवाईत नेमक्या काय त्रुटी आठळून आल्या याबाबत मात्र मौन बाळगण्यात आले असून या कारवायीने जिल्हयातील पंपचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पेट्रोल चोरीच्या या शोधाचा थेट संबंध महाराष्ट्राशी आहे. यूपीच्या विशेष पथकाने या पेट्रोल चोरीचा तपास लावला आणि त्याची महाराष्ट्रातील पाळेमुळे खोदून काढली. याप्रकरणी दोघा जणांना अटकही केली. पंपाच्या आत एक चिप बसवुन ती रिमोटने ऑपरेट केली जाते. यामुळे तुम्हाला शून्याचा आकडा बरोबर दिसतो.

तुम्ही मागितले तितके पेट्रोल तुमच्या टाकीत पडले आहे असे आकडे दिसतात. प्रत्यक्षात रिमोटच्या साह्याने ‘पेट्रोल डिलेव्हरी पल्स’ वाढविले जातात. आकडे वेगाने फिरतात, तेवढे पेट्रोल टाकीत पडत नाही.

पन्नास लिटरच्या मागे दोन लिटर पेट्रोलची चोरी होते.असे या प्रकरणातुन उघड झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे प्रकरण उघडकिस आले. या चिप उल्हासनगर परिसरात तयार होत आणि पुण्यावरून विकल्या जायच्या अशी माहिती उत्तर प्रदेशातील पेट्रोलचोरांनी दिली.

अटकेतील संशयितांकडून शेकडो चिप जप्त करण्यात आल्या आहेत. यातील काही चिप या नाशिकमध्येही विक्रि केल्या गेल्याची कबुली देत या संशयितांनी पेट्रोलपंपाची नावे क्राईम ब्रँचला दिली असून त्यानूसार नाशिकमध्ये कारवायी सुरू करण्यात आली आहे. आजही दोन पेट्रोलपंपाची तपासणी करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या तपासणीत काय आढळून आले याचा तपशील मिळु शकला नाही. जिल्हयात ही कारवायी सुरूच राहणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*