मालेगाव मनपा निवडणुक : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या

0

मालेगाव : आज सकाळपासून मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली होती. मात्र, एटीटी हायस्कूल मतदान केंद्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. राड्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

हाणामारीत दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत समर्थकांना पिटाळून लावले.

मालेगावमध्ये आज २१ प्रभागातील ८३ जागांसाठी मतदान होत असून ३७३ उमेदवारांचे भवितव्य इव्हिएम यंत्रांत बंद होणार आहे.

हाणामारीत जखमी झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नावे इरफान अहमद मो. आबिद, अब्दुल लतीफ अशी असल्याचे समजते.

 

 

LEAVE A REPLY

*