काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुख्याधिकार्‍यांना घेराव

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सतत ढगाळ वातावरण असते. त्यामुळे शहरात अनेक साथीच्या आजारांसह स्वाईन फ्ल्यूसारख्या आजार पसरण्याची शक्यता असून नगरपालिकेच्या दवाखान्यात गेल्या महिन्यापासून डॉक्टरच उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांची उपलब्धता करुन द्या, अशी मागणी करीत उपनगराध्यक्ष करण ससाणेंसह माजी नगराध्यक्ष संजय ङ्गंड, माजी उपनगराध्यक्ष दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, मुख्तार शहा, भाऊसाहेब डोळस, मुन्ना पठाण, सुभाष तोरणे, सिकंदर शेख, पताप देवरे, सुरेश ठुबे, युवराज फंड, सागर दुपाटी, सागर कुदळे, सिध्दार्थ फंड, निलेश बोरावके, निलेश नागले, श्री. पुंड, नितीन क्षीरसागर, किरण परदेशी, नितीन पाटील, सिध्दार्थ लिंगयात आदींसह शंभरावर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना त्यांच्या कार्यालयात घेराओ घातला.

मागील महिन्यापूर्वी पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी पगार नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत या रुग्णालयात डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. परंतु नगराध्यक्षांनी सांगितले की, त्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या कामाबाबत अनेक तकारी आल्या होत्या. डॉक्टरांऐवजी दुसर्‍या डॉक्टरांची नियुक्ती झाली पाहिजे म्हणून एका डॉक्टरांच्या कामाबाबत करार करण्यात आला होता. त्यामुळे त्या काळात केवळ एकच डॉक्टर कार्यरत होते परंतु त्या डॉक्टरांनीही राजीनामा दिला होता. त्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल असे आश्‍वासन कॉँग्रेस नगरसेवकांना मुख्याधिकार्‍यांनी दिले होती. आज महिना उलटूनही त्या रुग्णालयात डॉक्टर नियुक्त करण्यात आला नाही.

या ठिकाणी आलेल्या गरूब रुग्णांना शिरसगाव येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या रुग्णाची खराब परिस्थिती असेल तर त्याला शिरसगावला जाण्याऐवजी जो खासगी महागडयात रुग्णालयात नाईलाजास्ताव जावे लागते. तेच या ठिकाणी डॉक्टर असते तर या गरूब रुग्णांना कमी खर्चात उपचार घेता आले असते. नगराध्यक्षांकडे जे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विरोधात तकार अर्ज आले आहेत ते एकाच कागदावर, एकाच हस्ताक्षरात असे अर्ज आहेत. त्या अर्जावर ना तारीख ना आवक जावक नंबर त्यामुळे त्यांच्याकडे आलेले अर्ज हे बोगस असल्याचा आरोपही करण ससाणे यांनी केला. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकार्‍यांना नाहक बदनाम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान डॉ. कांबळे व डॉ. राऊत यांच्या राजीनाम्यानंतर पर्यायी डॉक्टर उपलब्ध होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू, असा इशारा काँग्रेस पदाधिकार्‍यांसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी दिला.

  •   नगरपालिकेच्या डॉक्टरांची नियुक्ती जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने करतात मात्र या राजीनामा दिलेल्या डॉक्टरांचा करार मार्च महिन्यातच संपला होता. शहरातील अनेक नागरिकांच्या सदर डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी असतानाही माझ्या अपरोक्ष त्यांच्या पुणर्नियुक्ती करण्यात आल्या. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यात याव्यात अशा सुचनाही मुख्याधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांच्या नियुक्तीनंतरच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी नसल्याचेही नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या.  नगरपालिकेच्या डॉक्टरांची नियुक्ती जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने करतात मात्र या राजीनामा दिलेल्या डॉक्टरांचा करार मार्च महिन्यातच संपला होता. शहरातील अनेक नागरिकांच्या सदर डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी असतानाही माझ्या अपरोक्ष त्यांच्या पुणर्नियुक्ती करण्यात आल्या. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यात याव्यात अशा सुचनाही मुख्याधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांच्या नियुक्तीनंतरच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी नसल्याचेही नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या. – अनुराधाताई आदिक      नगराध्यक्षा, श्रीरामपूर नगरपालिका
  •   नगरपालिका दवाखान्यातील डॉक्टरांना शोकॉज नोटीस न देता, पर्यायी डॉक्टरांची उपलब्धता न करता त्यांचे 4 महिन्याचे वेतन थांबवून त्यांना राजीनामा देण्यास पालिकेने भाग पाडले. त्यामुळे 1 महिन्यापासून रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप करुण डॉक्टर उपलब्ध होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. तसेच शहरात स्वाईन फ्ल्यू सदृश्य 2 रुग्ण आढळल्याचे सांगत साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त करुन वैयक्तीक कारणातून पालिका डॉक्टरांना राजीनामे देणे भाग पाडल्याचा आरोप केला.  नगरपालिका दवाखान्यातील डॉक्टरांना शोकॉज नोटीस न देता, पर्यायी डॉक्टरांची उपलब्धता न करता त्यांचे 4 महिन्याचे वेतन थांबवून त्यांना राजीनामा देण्यास पालिकेने भाग पाडले. त्यामुळे 1 महिन्यापासून रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप करुण डॉक्टर उपलब्ध होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. तसेच शहरात स्वाईन फ्ल्यू सदृश्य 2 रुग्ण आढळल्याचे सांगत साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त करुन वैयक्तीक कारणातून पालिका डॉक्टरांना राजीनामे देणे भाग पाडल्याचा आरोप केला. – करण ससाणे    उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर नगरपालिका
  •    पालिकेचे पगार अ‍ॅप्रोव्हल नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर मंजूर होते. मात्र त्यांच्याकडे या डॉक्टरांच्या तक्रारी असल्यामुळे नगराध्यक्षांनी स्वाक्षरी केली नसावी. शिवाय त्यांनीच स्वतः राजीनामे दिल्याने ते मंजूर करण्यात आले. त्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या तकारीचा एकही कागद माझ्याकडे आला नाही. त्यामुळे मला काहीच माहित नव्हते. त्यांच्या पगाराचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला असल्याचे एवढीच माहिती माझ्यापर्यंत होती. नवीन अधिकारी नियुक्तीबाबत मला काहीच नसलल्याचे ते म्हणाले.   पालिकेचे पगार अ‍ॅप्रोव्हल नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर मंजूर होते. मात्र त्यांच्याकडे या डॉक्टरांच्या तक्रारी असल्यामुळे नगराध्यक्षांनी स्वाक्षरी केली नसावी. शिवाय त्यांनीच स्वतः राजीनामे दिल्याने ते मंजूर करण्यात आले. त्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या तकारीचा एकही कागद माझ्याकडे आला नाही. त्यामुळे मला काहीच माहित नव्हते. त्यांच्या पगाराचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला असल्याचे एवढीच माहिती माझ्यापर्यंत होती. नवीन अधिकारी नियुक्तीबाबत मला काहीच नसलल्याचे ते म्हणाले. – सुमंत मोरे      मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका

LEAVE A REPLY

*