नाशिकरोडला कोम्बिंग ऑपरेशन

0
नाशिकरोड | शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकरोड परिसरातील जेलरोड, मालधक्का रोड, सुभाष रोड, गुलाबवाडी, गोसावीवाडी परिसरात आज नाशिक शहर पोलिसांनी कारवाई केली. सायंकाळी आठच्या सुमारास याठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन झाले.

या कोम्बिंगमध्ये पोलिसांच्या हातास कुणीही गुन्हेगार किंवा आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नाहीत. दरम्यान, कारवाई सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सायंकाळी अचानक नाशिकरोडला पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला होता. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या कारवाईबाबत माहिती झाली असेल म्हणून या परिसरात पोलिसांची कारवाई फोल ठरली असल्याची चर्चा परिसरात होती.

नाशिकचे पोलीस उपायुक्त  श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षण पंढरीनाथ ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*