जिल्हा सल्लागार समितीची भूमिका महत्त्वाची : जिल्हाधिकारी महाजन

0
सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना असतात. या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम या समितीच्या माध्यमातून होणार आहे.
वंचित घटकातील महिलांचे यामुळे आर्थिक स्थैर्य उंचावणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीप्रसंगी अध्यक्षीय भाषणात महाजन बोलत होते. या बैठकीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, जि.प. महिला, बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, जिल्हा सत्र न्याय विधीच्या वाघ , जिल्हा महिला सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्य मंगल भुजबळ, महिला व बालकल्याण अधिकारी सौ .माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कोकरे आदि उपस्थित होते.

दरम्यान वैयक्तीक, सामुहिक व निवासी कार्यरत असणार्‍या महिलांसाठी जिल्हा स्तरावर उपलब्ध असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. हुंडा पध्दतीच्या दुष्परिणामाबाबत चर्चा करुन, हुंडाबळी प्रकरणाच्या उपाययोजना व कौटुंबिक हिसाचारापासुन महिलांच्या संरक्षणा संदर्भात चर्चा करण्यात आली. महिला विकास महामंडळ, महिला घटक योजनेअंतर्गत राज्य शासन व केंद्र शासन आणि युनिसेफ पुरस्कृत योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*