मुख्यमंत्री लवकरच मराठा आरक्षणावर घोषणा करणार – रावसाहेब दानवे

0

मुंबई |  मराठा क्रांतीचा एल्गार मोर्चा आज मुंबईत दाखल झाला आहे. आज क्रांतीदिन आहे. या दिवसाचे औचित्य साधून मराठा आरक्षणावर आज घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

मुख्यमंत्री लवकरच मराठा आरक्षणावर मोठी घोषणा करतील असे नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

जिजामाता मैदान ते आझाद मैदान असा मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मूक मोर्चासाठी भव्य जनसागर आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे.

विधानभवनात मराठा आरक्षणावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानपरिषद तर दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत होत्या. अनेक विरोधक आमदार विधानभवनातून आझाद मैदानाकडे जाण्यास निघाले होते.

विरोधकांची आक्रमकता आणि मराठा समाजाचा जनक्षोभ बघता लवकरच भाजप सरकार आरक्षणाबाबत घोषणा करेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*