मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना : थकीत वीज बिलापोटी 26 कोटी 48 लाखांचा शेतकर्‍यांकडून भरणा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)– मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत नाशिक परिमंडलातील नगर विभागात 72 हजार 300 कृषी ग्राहकांनी 26 कोटी 48 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. ही माहिती वीज वितरणच्यावतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कृषी संजीवनीत सहभाग घेणे सोईचे व्हावे, यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. वीजबिलाची 30 हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असणारे शेतकरी तीन हजार तर 30 हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले शेतकरी पाच हजार रुपये भरून योजनेतील सहभाग होता आले.
वीज बिलाबाबतच्या कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी 1 ते 31 डिसेंबरपर्यंत फिडरनिहाय शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून कृषिपंप ग्राहकांना बिलासंदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण करून घेता येईल.
नाशिक परिमंडलातंर्गत येणार्‍या नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 6 लाख 62 हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास 3 हजार 468 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही जिल्ह्यातील 1 लाख 67 हजार ग्राहकांनी आतापर्यंत योजनेत सहभाग नोंदवला असून त्यांनी 70 कोटी 20 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
यात नाशिक शहर मंडलातील 46 हजार 537 कृषिपंप ग्राहकांनी 24 कोटी 25 लाख, मालेगाव मंडलातील 47 हजार 500 शेतकर्‍यांनी 19 कोटी 47 लाख तर अहमदनगर मंडलातील 72 हजार 300 कृषी ग्राहकांनी 26 कोटी 48 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

LEAVE A REPLY

*