समृद्धी बाधीत शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; बागायती जमिनींवर तोडगा काढण्याचे आश्वासन

0
नाशिक । समृध्दी महामार्गासाठी बागायती जमिनी वगळाव्यात अशी मागणी शेतकर्‍यांनी केल्यानंतर शेतकर्‍यांचे प्रश्नांवर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना चर्चेसाठी मुंबई येंथे निंमंत्रित केले आहे.
यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चेतून किमान बागायती जलमिनींबाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

आज दुपारी मेळा बसस्थानक येथे वातानुकुलीत बसपोर्टच्या भुमीपूजन सोहळ्याप्रसंगी समृध्दीबाधित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले. समृद्धी महामार्गासाठी बागायाती जमीनी तसेच त्यातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत संपादनाचा घाट प्रशासकीय अधिकार्‍यांकडून घातला जात असून आमच्या जमिनी वाचवा अशी विनंती समृध्दीबाधित शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यामुळे प्रस्तावित समृध्दी महामार्गाचा फेरविचार व्हावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. इगतपुरी तालुक्याने यापुर्वी अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत.

त्यामुळे आता येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत करून शेतकर्‍यांना भुमीहिन करू नये असे या निवेदनात म्हटले आहे.

सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादनाचा प्रयत्न केला तर समृध्दीबाधित शेतकरी सामूदायिक आत्मदहन करतील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. बागायती जमिनी संपादीत केल्या जाणार नाहीत असे सरकारचे सुरूवातीपासूनच धोरण राहीले आहे.

तरीही प्रशासकीय अधिकारी आमच्या बागायती जमिनी बागायती समृध्दीसाठी संपादीत करण्याचा घाट घालत असल्याकडे यावेळी शेतकर्‍यांनी लक्ष वेधले.

शेतकर्‍यांचे आदोलनाच्या पार्श्वभूमीवर सभेपुर्वीच समृध्दीबाधित शेतकरी प्रतिनिधींची भेट घेत त्यांंचे गार्‍हाणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले. बागायती जमिनी महामार्गासाठी जात असतील तर पुन्हा सर्व्हेक्षण करता येऊ शकते असे मुख्यमंत्र्यांकडून शेतकर्‍यांना सांगण्यात आले.

या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण निश्चित वेळ देऊ. शेतकर्‍यांनी् मुंबईत येऊन चर्चा करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यामुळे आमचे समाधान झाले असून यातून योग्य तोडगा निघेल असे शेतकर्‍यांनी सांगीतले. निवेदन देतेवेळी शेतकरी प्रतिनिधी कचरू डुकरे पाटील, सोमनाथ वाघ, रावसाहेब हारक, नवनाथ हारक किरण हारक, भास्कर वाघ, आनंदा हारक, सुनील चव्हाणके आदी उपस्थि होते.

LEAVE A REPLY

*