मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पून्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.
अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला.

हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.

त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेवून त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईस रवाना झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे की, रायगड जिल्हातील अलिबाग येथे आज एका कार्यक्रमासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस गेले होते. परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, असा कुठलाही अपघात झाला नसून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

LEAVE A REPLY

*