भुजबळांची जप्त केलेली ‘ती’ संपत्ती वडिलोपार्जित

विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचा आमदार जयवंत जाधव यांचा आरोप

0
नाशिक |  ईडीने भुजबळांच्या मालकीच्या काही संपत्तीवर मंगळवारी जप्तीची कारवाई केल्याचे वृत्त भूजबळांच्या जामिनाला प्रभावित करण्यासाठी विरोधकांनी पेरले असल्याचा आरोप आमदार जयवंत जाधव यांनी केला आहे.

ते म्हणाले की, मात्र जप्ती कायदेशीर दृष्ट्या चुकीची आहे. कारण यातील काही मालमत्ता छगन भुजबळांना त्यांच्या आजीकडून मिळाली आहे. तर काही मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित असून या मालमत्तेचा महाराष्ट्र सदन प्रकल्पाशी कुठलाही संबंध नाही.

या कारवाईला कुठलीही कायदेशीर पार्श्वभूमी नसतांना केवळ छगन भुजबळ यांच्या सध्या सुरु असलेल्या जामीन प्रक्रियेला बाधित करण्यासाठी विरोधक षड्यंत्र रचत आहेत. 

भुजबळ कुटुंबांकडून चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जात असून बाजू वकिलांमार्फत मांडली जात आहे. असे असतांना भुजबळ यांना जामीन मिळू नये यासाठी विरोधकांकडून अवास्तव व खोटे वृत्त पसरविण्याचे काम करत आहेत.

न्यायालयाची व जनतेची दिशाभूल करण्याचा हा कुटील डाव असून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कलम ४५ नुसार पी.एम.एल.ए कायदा असंवैधानिक घोषित केल्यानंतर यंत्रणांचा वेळकाढूपणा व विरोधकांचा खोडसाळपणा हा रडीचा डाव असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*