#IPL सामन्यांची वेळ बदलणार!

0

आयपीएलमधील सामने आता दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे

याआधी आयपीएलचे सामने दुपारी चार आणि रात्री आठ वाजता खेळवण्यात येत होते पण आता लवकरच हे नवे बदल करण्यात येणार आहेत.

यासंदर्भातला प्रस्ताव आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीसमोर ठेवला आहे.

आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना हा निर्णय मान्य असून केवळ प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियाच्या संमतीची आवश्यकता असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

*