मनमाड रेल्वेस्टेशनमधील चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद

0
मनमाड (बब्बू शेख) : मनमाड रेल्वे स्थानकाच्या तिकीट आरक्षण कार्यालयातून 1 लाख ६ रुपयांची धाडसी चोरी करून पळून गेलेले चोरटे तिकीट बुकिंग कार्यालय व रेल्वे स्थानकाच्या बाहेर हॉटेल मालकांनी लावलेल्या सीसीटीवी कैमेरेत कैद झाले.

ही टोळी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असल्याने त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास रेल्वे पोलीस उपाधीक्षक गौतम पवार, रेल्वे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबल व आरपीएफ इन्स्पेक्टर के.डी.मोरे यांनी व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यलया शेजारीच आरक्षण कार्यलय आहे. येथे नेहमीच गर्दी असते. बुधवारी या कार्यलयात तिकीट आरक्षण मुख्य पर्यवेक्षक केशव पराते व इतर दोन कर्मचारी कार्यलयात होते. दुपारी दोन वाजेनंतर  या तिघांची ड्युटीची वेळ संपणार होती.

त्यामुळे त्यांनी सर्व कैश एकत्र केल्यानंतर ती मोजून टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवून फ्रेश होण्यासाठी ते बाहेर गेले ही संधी साधून एक चोरटा आत आला.

त्याने ड्रावर मध्ये ठेवलेले 1 लाख ६ हजार रुपये चोरून तातडीने बाहेर  पडला.बाहेर त्याचे इतर तीन   जोडीदार होते. काम फत्ते झाल्याचे पाहून हे तिघे ही वेगवेगळ्या दिशेने पाळले व रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभी असलेल्या कार मधून पलायन केल.मात्र बुकिंग कार्यालय सोबत रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या हॉटेल संचालकांनी लावलेल्या सीसीटीव्ही कैमेऱ्यात ही टोळी कैद झाली. असल्याने त्यांना जेरबंद करणे सोपे झाले आहे.

मनमाडचे रेल्वे स्टेशन महत्वाचे जंक्शन असल्याने येथे सर्व प्लॉटफॉर्म,तिकीट बुकिंग व आरक्षण कार्यलया जवळ नेहमीच प्रवाशांची गर्दी असते असे असताना देखील चोरट्यांनी मोठे धाडस करून ही लुट केली त्यामुळे त्यांनी अगोदर काही दिवस येथील रेकी केली असावी.

त्यानंतर त्यांनी संपूर्ण तयारीनिशी ही धाडसी चोरी केली असल्याचे मत नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केले.रेल्वे स्थानकाच्या इतिहासात प्रथमच आरक्षण कार्यालयातील कैश लुटन नेल्याची ही पहिलीच घटना असून रेल्वे प्रशासन,रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्वानीच याची गंभीर दखल घेऊन कोणत्याही परिस्थितीत चोरांना पकडण्याचा निर्धार केला आहे.

पोलिसांच्या हाती चोरांच्या बाबतीत काही म्हत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते त्या आधाराव त्यांना पाक्ज्ञासाठी  वेगवेळ्या टीम तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*