कॅश काउंटिंगच्या नावाखाली बँकांकडून लूट

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – बाजारात 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यावरून निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण अद्याप निवळलेले नाही. एकीकडे बँकाकडून जनतेला 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत असताना दुसरीकडे याच बँका पेट्रोलपंप चालक, व्यापार्‍यांकडून कॅश काउंटिंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दर आकारात आहेत. या दरामुळे बँकाकडून लूट होत असल्याचे व्यापारी, पंपचालकांचे म्हणणे आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
बाजारात 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यावरून गोंधळाचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर जनता सर्रास 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. एसटी बसमध्ये तिकीट काढण्यासाठी दहा रुपयांची नाणी स्वीकारली जातात. मात्र, ते नाणे वाहकाने प्रवाशाना दिल्यास ते स्वीकारण्यास प्रवासी नकार देत आहेत. विशेष करून व्यापारी, पेट्रोलपंप चालक, किराणा व्यावसायिक यांच्याकडे दररोजचे 10 रुपयांच्या नाण्याचे चलन येत आहे.
हे नाणी जनता स्वीकारत नसल्याने व्यापार्‍यांना पर्यायाने हे चलन बँकेत जमा करावे लागत आहे. मात्र, बँकाकडून हे चलन स्वीकारताना करंट खात्यात ठराविक रकमेपक्षा अधिक चलन असल्यास कॅश काउंटिंगच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात येत आहे. यात प्रत्येक बँकेचा काउंटिंगचा दर वेगवेळा आहे. यात व्यापार्‍यांची लूट सुरू आहे.

लीड बँकेच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता, 10 रुपयांच्या नोटांपेक्षा दहा रुपयांच्या नाण्याचे आयुष्य अधिक आहे. यामुळे चलनरूपी नाणे बाजारात खेळत राहावे, बँकामध्ये कॅशलेस व्यव्हार व्हावेत, यासाठी ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम करंट अकाउंटला जमा करावयाची असल्यास काउंटिंगसाठी दर आकारणी करण्यात असल्याचे सांगण्यात आले. 

10 रुपयांची नाणी बँकांनी स्वीकारावीत. ही नाणी स्वीकारण्यासाठी बँका अतिरिक्त असा कोणताच कर आकारत नाही. मात्र, बँकांना कॅश काउंटिंगसाठी दर आकारता येतो. एक हजार रुपयांसाठी 10 रुपये असा हा दर आहे.
– राजेंद्र दायमा,
व्यवस्थापक लीड बँक.

LEAVE A REPLY

*