मराठी माणसाचा देशातील पहिला विमान कारखाना लवकरच सुरू होणार

कॅप्टन अमोल यादव यांना मिळाले प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता पाठपुरावा

0

मुंबई, ता. २० :  मराठी माणसाच्या देशातील विमाननिर्मितीचा पहिला खासगी कारखाना सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सात वर्षांपूर्वी भारतीय बनावटीचे पहिले सहा आसनी विमान बनविणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांना अखेर खासगी विमान निर्मितीसाठी नागरी उड्डयन खात्याच्या संचालनालयाकडून विमान उड्डाण नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

त्यामुळे लवकरच मेक इन इंडिया अंतर्गत पहिला खासगी विमाननिर्मिती कारखान्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ‍

कॅप्टन यादव यांनी अथक प्रयत्नांतून भारतीय बनावटीचे विमान तयार केले, पण त्याच्या निर्मितीसाठी त्यांना अनेक नागरी उड्डयन संचालनालयाकडे अनेक चकरा माराव्या लागल्या.

त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास पुढाकार घेऊन पंतप्रधानांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांना आणि कॅप्टन यादव यांच्या इच्छा शक्तीला यश येऊन अखेर यादव यांना खासगी विमान नोंदणीची  मिळाली आहे.

आता त्यांना लवकरच विमान उड्डाण परवानगी अपेक्षित असून ही चाचणी सफल झाल्यास त्यांच्या देशी बनावटीच्या विमान निर्मितीचा मार्ग सुकर होणार आहे.

LEAVE A REPLY

*