कनोलीत औषध फवारणी सुरू; 5 आरोग्य पथकांकडून घरोघर तपासणी

0
आश्‍वी खुर्द (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील कनोली येथे डेंग्यू सदृश आजाराने दोन महिलांचा बळी गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर जिल्हा आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून कनोलीत तळ ठोकून आहे. पाच आरोग्य पथकांच्या टीमकडून प्रत्येक घरांतील व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
नगरचे हिवताप अधिकारी डॉ. खुने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी साळुंके, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. मराठे, डॉ. करण नागपूरकर, पर्यवेक्षक संजय सावळे यांनी कनोलीत येऊन पाहणी केली. घटनेची माहिती घेतली.
आरोग्य पथकाला त्यांनी सूचना केल्या. त्यानुसार पथकांकडून प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. फॉगींग मशिनच्या सहाय्याने औषध फवारणी सुरू आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनाने वाबळे वस्तीवरील गोबर गॅसचे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजविले. परिसरातील सांडपाण्याचे खड्डे बुजविले. औषध फवारणी केली. परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान डेंग्यू सदृश आजाराची लागण झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ज्या व्यक्ती मयत झाल्या आहेत, त्यांचे अंतिम अहवाल येणे बाकी आहे. सध्या कनोलीतील परिस्थिती नियंत्रणात आहे.
-डॉ. सुरेश घोलप, आरोग्य अधिकारी, संगमनेर

LEAVE A REPLY

*