#Cannes2017: सर्वोच्च चित्रपट पुरस्कार ओस्टलंडच्या ‘द स्क्वेअर’ला

0

सत्तराव्या कान महोत्सवात  सर्वोच्च चित्रपटाचा पाम डिओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या ‘द स्क्वेअर’ या चित्रपटास जाहीर झाला आहे.

समकालीन कला जगत व त्यातून आधुनिक जगाचे प्रकटन या विषयावरील हा टीकात्मक चित्रपट असून ही निवड अपेक्षित नसली तरी वेगळी मानली जात आहे.

सत्तराव्या वर्धापन दिनाचा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.

गेल्या ६६ वर्षांत प्रथमच स्वीडिश चित्रपटास हा पुरस्कार मिळाला असून २०१४ मध्ये ओस्टलंड यांच्या ‘फोर्स मेजर’ या चित्रपटास परीक्षकांचा पुरस्कार मिळाला होता.

अल्फ सजोबर्ग यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ओस्टलंड हे दुसरे स्वीडिश दिग्दर्शक आहेत.

पुरस्कारांची यादी

  • कॅमडिओर पुरस्कार – जेन फेमी
  • उत्कृष्ट लघुपट – अ जेन्टल नाइट
  • परीक्षकांचा पुरस्कार – लव्हलेस
  • उत्कृष्ट अभिनेत्री – डायनी क्रुगर
  • उत्कृष्ट अभिनेता – जोआक्विन फिनिक्स
  • उत्कृष्ट दिग्दर्शक – सोफिया कोपोला
  • ग्रँड प्रिंक्स पुरस्कार – १२० बीट्स पर मिनीट
  • वर्धापन दिन पुरस्कार – निकोल कीडमन
  • पाम डिओर पुरस्कार – द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड)

LEAVE A REPLY

*