#Cannes2017: रेड कार्पेटवर अवतरले ‘ऐश्वर्य’

0

अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन काल (शुक्रवार) कान फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अवतरली.

डिझाइनर Michael Cinco यांनी डिझाईन केलेला ब्ल्यू बॉल गाऊन ऐश्वर्याने परिधान केला होता. ऐश्वर्याच्या ब्ल्यू बेरी लूकने कानमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ऐश्वर्याचा रेड कार्पेटवरील ब्लू लुक पाहून अभिषेक बच्चन याने तिचे गोड कौतूक केले आहे. “Love this photo…..Oh yes, and the beautiful lady in it too.”, असे त्याने ट्‍वीटही केले आहे.

तत्पूर्वी, कान नगरीत दाखल झाल्यानंतर ऐश्वर्याने तिची लाडकी लेक आराध्यासोबत कान सिटीत आउटिंग केले. या आउटिंगचेही फोटोज समोर आले आहेत. यावेळी ऐश्वर्याचा एलिगेंट लूक लक्ष वेधणारा ठरला तर आराध्या फ्लोरल प्रिंट फ्रॉकमध्ये क्यूट दिसली.
ऐश्वर्या पहिल्यांदा 2002 मध्ये संजय लीला भन्साली यांचा सिनेमा ‘देवदास’च्या स्क्रिनिंगसाठी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. मागील 15 वर्षांपासून ती कान फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे.

LEAVE A REPLY

*