Blog : सांग सांग भोलानाथ! आयफोन घेऊ का, अ‍ॅन्ड्रॉईड फोन घेऊ?

0
स्टेटस सिम्बॉल असलेला अ‍ॅपलचा आयफोनचे अनेक  खास फीचर्स आणि  कॅमेरॅची क्लिअ‍ॅरिटी याने तरुणाईला  भुरळ घातलेली आहे. त्यामुळे महागडा आयफोन आपल्याकडेही  असावा असे प्रत्येकालाच वाटते.. हौशी टेक्नोसॅव्हीं  हा महागडा फोन आर्थिक तडजोड करून ईएमआयवर विकत घेण्याच्या विचार करत असतात काही ठरवूनच टाकतात.

पण तरीही भारतातील बऱ्याचशी काटकसरी टेक्नोसॅव्हीं तरुणाई आयफोन ऐवजी  अ‍ॅन्ड्रॉईड फोनला पसंतीक्रम देतांना दिसून येते याची करणे खालीप्रमाणे सांगता येतील.

सिम स्लॉट – मोबाईल मार्केट मध्ये बहुतेक सर्वच मोबाईलमध्ये दोन सीम वापरसाचा पर्याय उबलब्ध आहे तशी  सोयच कंपनीने  दिलेली असते. पण याला अजूनही उपवाद आहे तो फक्त आयफोनचा कार्सन फक्त सिंगल सीमची सोय दिली आहे. याकारणामुळे  अनेकांना  दुसरा फोन  सोबत ठेवावा लागतो.

थर्ड पार्टी अ‍ॅप – विविध निरनिराळी मजेशीर, उपयोगी अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये असतात. याउलट सुरक्षेच्या कारणास्तव, डाटा चोरी होऊ नये म्हणून  अ‍ॅपल आपल्या फोनमध्ये इतर कुठ्ल्यानी कंपनीच्या अ‍ॅपला म्हणजेच थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्याची परवानगी देत नाही.

ब्राऊजर – अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये  एकापेक्षा अधिक ब्राऊजर वापरण्याची सोय असते. पण आयफोनमध्ये अशी सोय नाही तिथे मात्र डिफॉल्ड ब्राऊजर वापरणंच  बंधनकारक आहे.

इंटर्नल मेमरी – अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये विशिष्ठ इंटरनल मेमरी बरोबरच एक्सटर्नल मेमरीचाही स्लॉट दिला जातो. मात्र अ‍ॅपलच्या फोनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फिक्स्ड इंटरनल मेमरीचा पर्याय दिलेला असतो. त्यामुळे आयफोन १६ जीबी, ३२ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबी मध्ये उपलब्ध आहे.

चार्जिंग :  गूगल पिक्सल आणि  सॅमसंग J7 मध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेला असतो. यामुळे फोन झटपट चार्ज होतो. काही एलजी आणि सॅमसंगच्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. पण ही सोय आयफोनमध्ये अजूनही देण्यात आलेली नाही.

आयफोनमध्ये चार्जिंगसाठी लाइटनिंग कनेक्टर असतो. यामुळे तुमचा फोन हळूहळू चार्ज होतो.

–  प्रा. योगेश अशोकराव हांडगे

LEAVE A REPLY

*