#BOXING : विजेंदरचा चीनच्या मायमायतियालीवर शानदार विजय

0

भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाला हरवत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला आहे.

या लढतीच्या निमित्तानं मुंबईच्या क्रीडारसिकांना शनिवारी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारत विरुद्ध चीन असा मुकाबला पाहायला मिळाला.

मुंबईच्या एनएससीआयमध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. ही लढत व्यावसायिक बॉक्सिंगमधल्या दोन प्रतिष्ठेच्या किताबांसाठी खेळवण्यात आली होती.

बॅटलग्राऊंड एशिया असं शीर्षक या लढतीला देण्यात आलं होतं. या लढतीचा विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत.

विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्सिंगमधली ही नववी लढत होती त्यानं याआधीच्या आठही लढती जिंकल्या होत्या. चीनच्या झुल्पिकारनं आजवरच्या नऊपैकी सहा लढतींमध्ये नॉकआऊट विजय साजरा केला होता.

LEAVE A REPLY

*