पद्मावती वाद : ‘दीपिका बचाओ’ मोहीमेला कंगनाचा नकार!

0

संपूर्ण बॉलिवूड संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे समर्थन करत असताना कंगनाने मात्र वेगळाच मार्ग निवडला आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला साथ देण्यास तिने साफ नकार दिला आहे.

चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत असून दीपिका आणि भन्साळी यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर दोघांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली.

धमक्यांच्या निषेधार्थ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दीपिकाच्या सुरक्षेसाठीच्या याचिकेत अनेक अभिनेत्रींची स्वाक्षरी घेण्यात आली.

हेमा मालिनी, जया बच्चन, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विद्या बालन, अनुष्का शर्मा, प्रियांचा चोप्रा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्रींनी आझमींच्या मोहिमेत सहभाग घेतला. ती याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंगनाने मात्र त्या याचिकेत स्वाक्षरी करण्यास, दीपिकाला साथ देण्यास स्पष्ट नकार दिला.

LEAVE A REPLY

*