सोनाक्षी सिन्हाच्या मेकअप आर्टिस्टचा हार्ट अटॅकने मृत्यू!

0

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा मेकअप आर्टिस्ट नीलेश परमार याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नीलेशचे वय केवळ 30 वर्षे होते. सोनाक्षीने नीलेशसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘Life wont ever be the same again without this one’ असे लिहिले.

नीलेश सोनाक्षीसोबत तिचा पहिला ‘दबंग’ या चित्रपटापासून काम करीत होता. खरं तर इंडस्ट्रीमध्ये बरेचसे मेकअप आर्टिस्ट आहेत. परंतु सोनाक्षीने नीलेशची निवड केली होती. सोनाक्षीच्या मते, नीलेश नॉन स्टॉप एंटरटेनमेंटचा सोर्स आहे.

LEAVE A REPLY

*