BLOG : खा…प्या…मज्जा करा!

0
बुधवारी मध्यरात्री राज्य सरकारने एक विधेयक विधानसभेत मंजूर केले. राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट रात्रभर सुरू ठेवण्यासोबत आस्थापना कायद्यात बदलांचे हे विधेयक अन्य राजकीय गोंधळामुळे फारसे चर्चेत आलेच नाही.
आता मंजूरी मिळाल्याने दिवस-रात्र खा, प्या आणि मजा करा धोरणाला गती मिळणार आहे. 24 तास दुकाने, मॉल्स आणि रेस्टॉरंट ही खरे तर मेट्रो शहरांची गरज! राज्यातील नगरसारखी जिल्हाच्या ठिकाणांवर याचा परिणाम अशक्य! राज्याच्या विचार करता मुंबई, पुणे आणि नागपूर आणि काही प्रमाणात औरंगाबाद आणि नाशिक या शहरांसाठी हा दिसतो. सध्याची सरकारे चंगळवादाला प्रोत्साहन देणारी आहेत. चंगळवादी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या महागड्या लक्झरी कारला जीएसटी कमी करून गरिबांच्या वापरातील अत्यावश्यक वस्तूंना कराच्या जाळ्यात ओढण्याची कमाल नुकतीच झाली. शेतकरी माल विकताना घायकुतीला कसा येईल, याची काळजी जवळपास प्रत्येक पक्षाचे सरकार घेत असते. करबुडव्यांना पायघड्या हे काँग्रेस सरकारपासून सुरू असलेले धोरण आजही थांबलेले नाही. उलट आधी पायघड्या कॉटनच्या होत्या, आता रेशमी आहेत. मोठा व्यापारी, उद्योजक कसा खुष होईल, यासाठी घेतली जाणारी काळजी सरकारी निर्णयांमध्ये झकळली तर त्याचे आश्‍चर्य वाटून घेऊ नये, असा हा जमाना! तर या नव्या धोरणानुसार काही बंधनेही घालण्यात आली आहेत. राज्यात रात्रभर मॉल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची मुभा सर्वांना असली तरी कोणती दुकानं आणि रेस्टॉरंट किती वेळ सुरू ठेवायची याचा अधिकार पोलिसांना दिला आहे. त्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक असेल. कायदा आणि व्यवस्था राखायच्या नावाखाली नवे कुरण तयार होण्याची भिती आहे. अनेकठिकाणी बिअरबार आणि रेस्टॉरंटच्या नावाने चालणार्‍या कुप्रसिद्ध अड्ड्यांना पोलीस कसे हाताळणार याकडे लक्ष ठेवावे लागेल. यातून राज्याच्या नेमका कोणता फायदा होणार, हे सरकारने जनतेसाठी स्पष्ट करणे अपेक्षीत होते. तसे मात्र झालेले नाही. दिवसा झोपणार्‍या आणि रात्र जागविणार्‍या अमिरजाद्यांसाठी सोयींबद्दल जागरूक असलेले सरकार पिचणार्‍या जनतेचे कधी होणार?

LEAVE A REPLY

*