भाजप सरकार शेतकरीविरोधी : माजी मंत्री पिचड

0
अकोले (प्रतिनिधी) – सध्या शेतकरी कठीण परिस्थितीतून जात आहे. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, ही चिंतेची बाब असून आज शेती माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच केंद्रातले व राज्यातले भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्याचे काम करीत असताना शेतकर्‍याला वाचविण्याचे काम आपल्याला करायचे असून त्यासाठी आरपारची लढाई आपल्याला करावी लागणार असल्याचा इशारा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 19 व्या स्थापनादिवसा च्या निमित्ताने पिचड बोलत होते. वर्धापन दिनानिमित्त पार्टी कार्यालय समोर तालुका अध्यक्ष गिरजाजी जाधव यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकचे अध्यक्ष सीताराम गायकर, झेडपी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले,

अकोले तालुका एज्यकेशनु सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, अगस्तीचे संचालक मीनानाथ पांडे, कचरू शेटे, राजेंद्र डावरे, इंजि. सुनील दातीर, सुरेश गडाख, नगराध्यक्ष वकील के. डी. धुमाळ, अ. ता. एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंत आभाळे, बाजार समिती सभापती परबत नाईकवाडी, महिलाध्यक्षा चंद्रकला धुमाळ,शहराध्यक्षा कल्पना सुरपुरिया, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, माजी सरपंच संपत नाईकवाडी, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले आदी उपस्थित होते.

पिचड म्हणाले की, निवडणुका येतात जातात पण आपण मात्र लोकांचा प्रश्नावर लढले पाहिजे. पुढील महिन्यात आपण पक्षांची व्यापक बैठक घेणार असून पक्षीय पातळीवर संघटन मजबूत करण्याचा दृष्टीने प्रयत्न करणार आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उप सभापती संतोष देशमुख, नगरसेवक नामदेव पिचड, सचिन शेटे, बाळासाहेब वडजे, परशुराम शेळके, सुरेश लोखंडे, पं. स. सदस्या माधवी जगधने, सीताबाई गोंदके, सारिका कडाळे, गोरक्ष पथवे, युवक कार्यकर्ते राहुल देशमुख,
अभिनव उपाध्यक्ष विक्रम नवले, माध्यमिक शिक्षक सोसायटी चे उपाध्यक्ष सुनील वाळुंज, नंदाताई धुमाळ, हेमलता चासकर, बाजार समिती संचालक सुधीर शेळके, दिलावर शेख, मनोज गायकवाड, सतीश पाचपुते, सचिन चासकर, शैलेश देशमुख, सरपंच अनिल देशमुख , आनंद वाकचौरे, दत्तात्रय भोईर, युवक कार्यकर्ते नीलेश चौधरी, विजय पवार, बाबासाहेब आभाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे सरचिटणीस यशवंत आभाळे यांनी केले.
 शेतकर्‍यांचा संपाला पाठिंबा देण्यासाठी 12 जूनला तहसीलवर मोर्चा, तर 13 जूनला  रास्ता रोको  आयोजित केला असून, प्रत्येक गावाने ग्रामसभा घेऊन शेतकर्‍याला संपूर्ण कर्ज माफ करावे असे ठराव करून सरकारला पाठवावे, असे  आवाहन यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

LEAVE A REPLY

*