Wednesday, April 24, 2024
HomeजळगावVideo पोलीस ठाण्यातच साहेबांसह कर्मचार्‍यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

Video पोलीस ठाण्यातच साहेबांसह कर्मचार्‍यांचा वाढदिवस दणक्यात साजरा

‘मी आतापर्यंत माझा कर्तव्याच्या ठिकाणी प्रत्येक सहकारी कर्मचार्‍यांचे दररोज वाढदिवस साजरे करतो. यामुळे पोलिसांच्या रोजच्या कामकाजातील थोडा तनाव दुर होता. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करा, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. माझासह आमच्या एक दोन सहकार्‍यांचा वाढदिवस असल्यामुळे उत्साही तरुण कर्मचार्‍यांनी पाच ते सहा मिनिटे गाण्यांवर नृत्य केले. यातून परिवारासारखा वाढदिवस साजरा करत असल्याचा आनंद आम्हाला मिळाला. सर्व सहकार्यांना वाढदिवसाचा आनंद घेता यावा. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला वाढदिवस केला. या कुठल्याही प्रकाराचे गैरकृत किवा नियमाचे उल्लघन झालेले नाही”-

-के.के.पाटील

- Advertisement -

मनोहर कांडेकर

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgaon

चाळीसगाव (police) पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक के.के.पाटील हे नेहमीच कुठल्याना कुठल्या कारणासाठी चर्चेत राहतात. मागील महिन्याभरापूर्वीच किर्तन सोहळा बंद पाडत, थेट नारदाच्या गादीचा त्यांनी अवमान केल्यामुळे वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात एकवटला होता. आता पुन्हा ते नव्याने चर्चेत आले आहेत. नुकताच १ जुन रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केल्याची चर्चा आहे. साहेबांसह सहकारी र्कमचार्‍याचा वाढदिवस असल्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी मोठ्या दणक्यात चाळीगाव पोलीस स्टेशनमध्ये नाचून मोठ्या आनंदाने साजरा केला. पोलिसांच्या रोजच्या कामकाजात खूप तनाव असतो. त्यामुळे प्रत्येक कमर्र्चारा छोटेखानी वाढदिवस साजरा करुन, हा तनाव दुर करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे मानसीक तनाव दुर होवून, नवीन काम करण्यासाठी उर्मी येत असल्याचे साहेबांचे म्हणने आहे. तशा सूचना देखील वरिष्ठ आधिकार्‍यांच्या आहेत.

१ जून रोजी के.के.पाटी यांच्यासह एक दोन पोलीस कर्मचार्‍या देखील वाढदिवस असल्यामुळे, यात के.के.पाटील व सहकारी कर्मचार्‍याला, पोलीस कर्मचार्‍यांनी थेट खाद्यावर घेवून नृत्य केल्याचे दिसत आहे. तर काही कर्मचारी वाढदिवसानिमिताने पोलीस स्टेशनच्या बाहेर रात्री नाचताना दिसत आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवस साजरा करणे गैर नाही, परंतू तो आपन कुठे आणि कसा साजरा करतो, याला फार महत्व आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये साहेबांसह कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा करताना (video) व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक चर्चाना ऊत आला आहे. परंतू या चर्चा निरर्थक असून काही एक अर्थ नाही. कारण वाढदिवसात कुठल्याही प्रकारची ओली पार्टी किवा गैरकृत्य झाल्याचे दिसून येत नाही. के.के.पाटील यांनी रजू झाल्यापासून चाळीसगावात दोन नबंर धंदे व पोलीस स्टेशनमध्ये लुडबुड करणार्‍यांचे लाड बंद केले आहेत. त्यामुळे केवळ के.के.पाटील यांना जाणीवपूर्वक टारगेट करण्यासाठी काही लोक सोशलमिडीयावर त्यांचा बदनामी करत असल्याची चर्चा पोलीस कर्मचार्‍यांमध्ये आहे.

– के.के.पाटील, पोलीस नि.

- Advertisment -

ताज्या बातम्या