सहा महिन्यांत 248 दुचाकी चोरी ; मिळाल्या 60

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरात गेल्या सहा महिन्यांत विविध ठिकाणांहून 248 दुचाकी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील केवळ 60 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. सोमवारी (दि.7) नेवासा व शेवगावच्या सराईत चोरट्यांकडून एकाच वेळी 15 वाहने मिळाली असून बहुतांशी वाहने होंडा एव्हेटर आहेत. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुधीर कडूबाळ सरकाळे (रा. शेवगाव), हरिभाऊ बारकू पळसकर व संतोष साहेबराव फुलारी (दोघे रा. देडगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत.
केडगाव परिसरातून वाहने चोरीची घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली होती. हे फुटेज पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती आले असता त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यातील मुख्य आरोपी सरकाळे याचा शोध लागला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक होंडा एव्हेटर वाहनाची चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. रात्री पोलिसांनी सरकाळेकडे कसून चौकशी केली. त्यानंतर पळसकर व फुलारी यांची नावे पुढे आली. वाहनचोरी करणारी ही चेन उघड होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाला रात्रभर जोर लावला.
त्यात एकूण 15 वाहने व काही खोललेल्या वाहनांचे पार्ट मिळून आले. रात्रभराच्या या मोहिमेत कोतवाली पोेलिसांनी मोठी कामगिरी केली असून सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी या कामाचे कौतुक केले आहे.
सन 2016 मध्ये एकट्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शंभर वाहने चोरी गेले होते. तर गेल्या सहा महिन्यांत 104 वाहने चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यातील केवळ 23 वाहनांचा शोध करण्यात पोलिसांना यश आले होता. ही आकडेवारी लक्षात घेता सहा महिन्यांत दुचाकी चोरीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. त्या खालोखाल तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून अन्य दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरातील वाहन चोर्‍यांना आळा बसणार आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस कर्मचारी दीपक गाडीलकर, गणेश लकडे, अहमद इनामदार, बंडू भागवत, संदीप धामणे, सुमित गवळी, बर्डे, रवी टकले, दुधाळ, रवींद्र गुंगासे, राजेंद्र मुळे, अविनाश बर्डे, संदीप गवारे, सोनार यांनी केली.

वाहन चोरीचे अड्डे – 
शहरातील कोतवाली हाद्दीत सर्वात जास्त वाहने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात वाडीया पार्क, कापडबाजार, चितळेरोड, माळीवाडा, हॉस्पिटल पार्कींग, बस स्थानक, केडगाव येथून वाहन चोरीचे प्रमाण अधिक आहे. तसेच तोफखाना हाद्दीत हॉस्पिटल पार्कींग, पाईपलाईन रोड, एकविरा चौक, तारकपूर, भिस्तबाग, झोपडी कॅन्टीन, लालटाकी, बालिकाश्रम रोड, कॉलेज या ठिकाणांहून वाहने चोरी होतात. खरे पाहता पोलिसांना यातील बहुतांशी चोर माहित असतात. मात्र अशा चोरट्यांवर कारवाई करणे टाळले जाते. अशी चर्चा नगरिकांमध्ये नेहमीच असते.

पोलीस ठाणे  गेलेली वाहने ,  मिळालेली वाहने

तोफखाना     35             05

कोतवाली     104            42

भिंगार         17             03

एमआयडीसी  12             05

नगर तालुका  20             05

LEAVE A REPLY

*