वरखेडा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

0

वरखेडा । दि. 29 वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे शेतात भुईमुंग निंदणी, खुरपणी करताना काल दुपारच्या सुमारास महिलांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावला आहे.

वरखेडा, आंबेवणी, परमोरी, राजापूर, अवनखेड, लखमापूर ,करंजवण व शिवनई या गावांमध्ये बिबटयाचा मुक्त संचार होत असुन कुत्रे शेळ्या – बकर्‍या व लहान वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ले केले आहे.

मागील आठवड्यात देखील या परिसरातील राजापूर येथील शेतकर्‍यांचे दोन बोकड बिबट्याने फस्त केले.काल शेतात काम करणार्‍या महिलांनी बिबट्याला पाहिल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

पावसाळ्याच्या हंगामात शेतात अनेक कामे असून , बिबट्याच्या दहशतीने शेतात काम करणे कठिण झाले. दोन दिवसांपुर्वी नाशिक -कळवण मार्गवरील अवनखेड पुलांवर बिबट्यांने दर्शन दिले होते.

या परीसरात ऊसाचेे पिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे.

या घटनेची माहिती वरखेडा येथील शेतकरी डी.एस. उफाडे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुनिल वाडेकर यांच्या मार्गदर्शानाखाली वनपाल अनिल दळवी, वनरक्षक एस.जी. मोगरे , एस.पी.चौरे, रमेश झुरडे या कर्मचारी वर्गाने घटनास्थळी येवून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणीे पावलांचे ठसे घेवून पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

*