बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0

राहुरी तालुक्यातील सायंकाळची घटना

राहुरी (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे एक बिबट्याने शेतकरी महिलेला ठार केल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मानोरी शिवारातील आढाव वस्तीवर प्रसाद आढाव हे आपल्या कुुटुंबीयांसमेवत राहतात. काल बुधवारी सायंकाळच्या वेळी त्यांच्या पत्नी सुनीता या मुळा नदीकाठी असलेल्या शेतात गवत आणण्यासाठी गेल्या होत्या.
बराचवेळ झाला तरी त्या आल्या नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शेतात जाऊन पाहिले तर त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या नरडीला ओबडल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात त्या मृत झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांचाही तोच प्राथमिक अंदाज आहे. रात्री या घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात नवरा, सासू, सासरे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*