माहिजळगावमध्ये आढळले भूयार

0

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील माहिजळगांव येथील गोरख खेडकर यांच्या घराच्या भिंती शेजारी रात्रीच्या सुमारास अचानक 20 फूट खोल खड्डा पडून भूयार तयार झाले आहे. याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने भूयार पाहण्यास ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

बुधवारी सकाळी माहिजळगांव येथील गोरख साहेबराव खेडकर यांच्या घराशेजारी गोल खड्डा दिसला. त्यांनी खड्ड्यात बॅटरीच्या सहाय्याने पाहिले असता सुमारे 20 फूट खोल भूयार असून तिन दिशेला भूयारे असल्याचे लक्षात आले. या भूयारात काय असावे, लांबी किती आहे याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. ाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी भूयाराची पहाणी केली. कळविल्यावर त्यांनी येथे येऊन या भूयाराची पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

*