सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त महत्त्वाची : भास्करगिरी महाराज

0
राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – सहकारात आर्थिक शिस्त व विनम्र सेवा महत्त्वाची आहे. साई आदर्शने आर्थिक शिस्त पाळतानाच सर्व सामान्यांना न्याय देण्याच्या हेतूने सुरु केलेले काम हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
पंढरपूर देवस्थानच्या विश्‍वस्तपदी निवड झाल्याबद्दल देवगड संस्थांनचे महंत भास्करगिरी महाराज यांचा साई आदर्श मल्टिस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे व संचालक मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. भास्करगिरी महाराज यांनी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व संचालक मंडळाने अध्यात्म व अर्थकारण यांची जोड दिल्याने या संस्थेची भरभराट होईल असा आशीर्वादही दिला.
यावेळी विष्णुपंत गिते, डॉ. विलास पाटील, बाळासाहेब तांबे, किशोर थोरात, अविनाश साबरे, अजय साबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*