Video : भंगार बाजार अतिक्रमण काढण्यास सुरुवात; ५ जण ताब्यात; मोठा फौजफाटा तैनात

0
उच्च न्यायालयाने भंगार व्यावसायिकांची याचिका फेटाळल्यानंतर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भंगार बाजार अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. सकाळपासूनच या परिसरात महापालिकेची कर्मचारी, अधिकारी हजार झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नुक्त्याच्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी भंगार बाजार अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्या असून अतिक्रमण मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे.

विनापरवानगी व बेकायदा वसलेल्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारावर गेल्या जानेवारी महिन्यात मोठी कारवाई झाली होती.

परंतु त्यानंतर या व्यावसायिकांनी पुन्हा व्यावसाय थाटल्यानंतर आज (दि.12) या भंगार बाजारावर महापालिकेचा हातोडा पडन्यास सुरुवात झाली आहे.

यासंदर्भात महापालिकेकडून आणि शहर पोलिसांकडून तयारी पूर्ण झाली असून आताच्या कारवाईत भंगार माल जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात महापालिका व शहर पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत साडेसातशेच्या वर भंगार दुकानांवर कारवाई केली होती. तीन दिवस चाललेल्या कारवाईत मोठमोठे शेड, घरे तोडण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून भंगार बाजाराची ओळख निर्माण झाली होती.

हा बेकायदेशीररीत्या वसलेला भंगार बाजार हटवण्यासाठी नगरसेवक दिलीप दातीर यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर यात न्यायालयाने भंगार बाजार हटवण्याचे आदेश दिले होते. अखेर महापालिकेने शहराच्या इतिहासात अतिक्रमण काढण्याची सर्वात मोठी कारवाई केली होती. या कारवाईनंतर सात महिन्यांत पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार बाजार सुरू झाला.

भंगार बाजारावर कारवाई करण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाकडून पुन्हा एकदा सेक्टर तयार करून 7 स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत. सेक्टरमध्ये काम करणार्‍या पथकाचे नेतृत्व कार्य. अभियंता व विभागीय अधिकारी करणार आहेत. एका पथकात 3 जेसीबी, 6 डंपर व 2 क्रेन अशी साधने वापरली जात आहेत.

Video :

LEAVE A REPLY

*