भंडारदरा परिसरात गारांचा पाऊस

0
भंडारदरा (वार्ताहर) – भंडारदरा धरण परीसरात वादळ वारा व गारांच्या वर्षावासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काल दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसालाजोरदार सुरुवात झाली व पावसासोबत मोठमोठ्या गारांचा देखील वर्षांव होऊ लागला.
त्यामुळे आबालवृद्धासह बालगोपाळांनी गारा खाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला. साधारण अर्धातास पाऊस पडला व नंतर विश्रांती घेतली. या पावसाची नोंद 5 मिमी झाली आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. करवंद, जांभूळ, गावरान आंबे यांचे नुकसान झाले असल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
काळोखात लक्ष लक्ष प्रकाशफुले!
पाणलोटात काजव्यांचे आगमन झाले आहे. आता पाऊस कोसळल्याने काजव्यांच्या संख्येत वाढ होणार असून काही दिवसांत लक्ष लक्ष काजवे…नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला येणार आहेत. आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात ‘अग्निशिखा’ हे विशेषण सार्थपणाने मिरविणार्‍या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

*