Photogallery : भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु

0

भंडारदरा : भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही शनिवारी रात्री पासून पावसाची संततधार सुरु आहे.

आज सकाळ पासून तालुक्यात सर्वदूर पावसाची हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

रविवार सुट्टी मुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी भंडार दरा परिसरात दिसत आहे.

मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने धबधबे फेसाळत आहेत. ओढ़े -नाले तुडंब भरून वाहू लागले आहे.

रस्त्यावर पाणीच पाणी साठले आहे.त्यातच कोल्हार- घोटी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.पावसाच्या पाण्याने खड्यांचा अंदाज प्रवासी व पर्यटकांना येत नाही.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यातही हळू हळू वाढ सुरु आहे.

भंडारदरा धरणात आज रविवारी सकाळी १० हजार ६४० दलघफु, निळवंडे धरणात ७ हजार ८०२ दलघफु तर आढला धरणात १ हजार ६० दलघफु इतका पाणी साठा होता.

सध्या निळवंडे धरनातुन १६७४ क्यूसेक ने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडन्यात येत आहे.

भंडारदरा परिसरात होत असणाऱ्या दमदार पावसामुळे सायंकाळ पर्यन्त धरणाच्या पाणी साठयात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रवरा,आढळा व मुळा परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार सुरु आहे.

LEAVE A REPLY

*