Wednesday, April 24, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा धरणात एवढा टक्के पाणीसाठा !

भंडारदरा, मुळा धरणात एवढा टक्के पाणीसाठा !

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara | Kotul

भंडारदरा धरण पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात नव्याने सकाळपर्यंत 115 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या धरणात पाणीसाठा 7272 दलघफू झाला होता. त्यात सायंकाळपर्यंत आणखी वाढ झाली. रात्री उशीरा हा पाणीसाठा 7370 दलघफू (67 टक्के) झाला होता.

- Advertisement -

दोन-तीन दिवसांपासून पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात धिम्या गतीने पाणी येत आहे. काल दिवसभर भंडारदरात 21 मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणात 42 दलघफू पाणी आले. पाणीसाठा 2405 दलघफू (29 टक्के ) झाला होता.

काल सकाळपर्यंत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस मिमीमध्ये-

भंडारदरा 30, घाटघर 68, पांजरे 59, रतनवाडी 69, वाकी 19.

मुळा पाणलोटातही रिपरिप सुरू असल्याने धरणाकडे धिम्या गतीने पाणी जात आहे. 47 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने काल सकाळी धरणातील पाणीसाठा 10326 दलघफू (39.72)झाला होता. तर कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 2247 क्युसेकने सुरू होता. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा आज 40 टक्क्यांवर पोहचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या