पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजां मुंडेंचे नामदेव शास्त्री यांना पत्र

0
मुंबई : यंदाही भगवानगड दसरा मेळाव्याच्या वाद कायम आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करते.
लोकांची तळमळ पाहून कोणी मध्यस्थी नको म्हणून मीच विनंती करते, शेवटी मी लहानच आहे. मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा. काही नको त्यांना फक्त 20 मिनिटं वेळ वर्षातून द्या. ते पुन्हा कोयता घेऊन राबायला जातील, त्यांना ऊर्जा मिळते.

मी आतापर्यंत कोणापुढे झुकले नाही, मात्र समाजासाठी नतमस्तक होते. मला दिवाळीची माहेरची भेट द्या, असं पंकजा मुंडे यांनी पत्रात लिहिलं आहे.

LEAVE A REPLY

*